महापालिकेचे मोठे अधिकारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : महापालिकेचे दोन मोठे अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका १४ वर्षे वयाच्या मुलाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे.

संबंधित मुलाची आई देखील पालिका कर्मचारी आहे. हे अधिकारी व कर्मचारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात. एका अधिकाऱ्याने तर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील या मुलाने तक्रार अर्जात म्हटले आहे.

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी या मुलाच्या तक्रार अर्जाची तत्काळ दखल घेतली. स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावून घेतले.

File Photo

प्राथमिक चौकशी केल्यानंतर हे प्रकरण बाल संरक्षण समितीकडे दाखल झाले. बाल संरक्षण समिती याप्रकरणी कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले तक्रारदार मुलाची आई महापालिकेतच नोकरीला आहे.

तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. महापालिकेचे दोन अधिकारी व तीन कर्मचारी रात्री-अपरात्री या महिलेच्या घरात येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात, असा तक्रार या महिलेच्या मुलाने पोलिस अधीक्षकांकडे केला.

File Photo

चार-पाच दिवसांपूर्वी एक अधिकारी व तीन कर्मचारी घरी आले. रात्री अकरा वाजता मी झोपेतून उठलो, तेव्हा ते घराच्या हॉलमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत होते.

मी त्यांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्याने मला बूट फेकून मारला, माझा गळा देखील दाबला.

मात्र, मी कशीबशी माझी सुटका करून घेतली. या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे. मला न्याय द्यावा, असे या मुलाने तक्रार अर्जामध्ये म्हटले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24