ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा खून ! मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांनी नकार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जुन्या घाटामध्ये खून झालेल्या अल्पवयीन मुलीची ओळख पटली आहे. सदर मुलगी ही संगमनेर शहरातील रहिवासी असून अज्ञात आरोपीने या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा निघृण खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच स्पष्ट झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी परिसरातील जुन्या घाटामध्ये रविवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. हा मृतदेह महिलेचा असून सात आठ दिवसांपूर्वीच तिचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला होता.

पोलिसांनी या घटनेचा त्वरित तपास करून खून झालेल्या मुलीची ओळख पटविली आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी चौघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन मुलीला संगमनेर शहरातुन चंदनपुरी घाटात नेऊन दगडाने डोके ठेवून तिचा खून करण्यात आला.

ही मुलगी राहाता तालुक्यातील असून सध्या ती संगमनेर उपनगरातील एका विद्यालयाजवळ राहत होती. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख पटविली आहे.

तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांनी नकार दिल्याने पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी पिडीतेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.

Ahmednagarlive24 Office