अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील वाकी शिवारात एका अनोळखी तरुणाचा अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाच्या हत्येनंतर मृतदेहाचे ९ तुकडे करून ते दोन गोण्यांमध्ये भरले आणि त्या कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिल्या.
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पुलाखाली दोन गोण्यांमध्ये काहीतरी भरल्याचे त्यांना दिसले. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती.
त्या गोण्या उघडून पाहिल्यानंतर शरीराचे तुकडे असल्याचे दिसले. २० ते २५ वयोगटातील तरुणाच्या शरीराचे तुकडे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पाच ते सहा दिवसांपूर्वीच या गोण्या याठिकाणी फेकल्या असाव्यात.
याबाबत राजूर पोलिसांशी संपर्क केला असता, ‘नदीवरील पुलाखाली सापडलेल्या गोण्यांमध्ये साधारणपणे वीस ते २५ वर्षांच्या तरुणाच्या शरीराचे नऊ तुकडे करून टाकल्याचे आढळले आहे.
ते साधारणत: पाच ते सहा दिवसांपूर्वी संबंधित ठिकाणी फेकण्यात आले असावेत, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews