संडास बांधण्यासाठी विवाहितेचा छळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर :- तालुक्यातील खातगाव टाकळी येथील सौ. वृषाली निलेश मेढ, वय २१ वर्ष ही सासरी नांदत असताना तिने माहेरच्या लोकांकडून संडास बांधण्यासाठी १ लाख रुपये आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

वेळोवेळी पैशाची मागणी करत तू आयटीआय कोर्स करायचा नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन धमकी दिली. उपाशीपोटी ठेवले. या त्रासास कंटाळून वृषाली निलेश मेढे या विवाहित तरुणीने काल

एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा निलेश रोहिदास मेढे, सासू सविता रोहिदास मेढे, सासरा रोहिदास उमाजी मेढे, सर्व खातगाव टाकळी, ता. नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24