आमदार म्हणून निवडून आलो मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे : आमदार लंके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
नगर : मीरावलीबाबा दर्गाह या दरबारवर माझी लहानपणापासून आस्था आहे. मी लहानपणापासून माझे आई व वडिलांसोबत सतत येत आहे.
आज आमदार म्हणून निवडून आलो आहे, ते मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे. पुढील काळात मीरावलीबाबा दर्गाहच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले.
आमदार लंके यांनी मीरावलीबाबाचे दर्शन घेतले. या वेळी मीरावलीबाबा दर्गाहचे मजारवर त्यांनी गलप व फुलांची चादर अर्पण केली. या वेळी ते बोलत होते.
आमदार लंके यांचा मुजावर इमरान जहागीरदार, मीरा बिल्डर्सचे इरफान जहागीरदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुजावर राजूभाई जहागीरदार यांच्याकडून मीरावलीबाबाचे आत्मचरित्रावर लिहिलेले पुस्तक त्यांना भेट देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे साहेबान जहागीरदार, अल्ताफ, दानिश शेख, सज्जाद जहागीरदार, अजीम राजे, अजय झोल, नईम शेख, अरबाज़ पठाण, मुकुंद दळवी आदी उपस्थित होते.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24