रेल्वे सेवा सुरु होताना नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे देखील कार्यान्वीत करावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  मागील सहा महिन्यापासून कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले असताना दळणवळण देखील ठप्प आहे.

देशात अनलॉकची प्रक्रिया पार पाडत असताना रेल्वे सेवा सुरु होताना नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे कार्यान्वीत करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना व नगर पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या वतीने

सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे हरजितसिंह वधवा, अशोक कानडे, प्रशांत मुनोत, विपुल शहा, सुनील छाजेड, संजय सपकाळ, संदेश रफारिया, संजय चव्हाण यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प आहे. मागील पाच महिन्यानंतर 2 रेल्वे गाड्या प्रत्येक स्थानकावर सुरू करण्यात आल्या.

प्रवासासाठी नागरिकांना रेल्वे हा सर्वात चांगला पर्याय आहे.नागरिकांच्या गरजेनुसार नवीन वेळापत्रक जाहीर केल्यास याचा नागरिकांसह रेल्वेला देखील आर्थिक फायदा होणार आहे.

अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना व नगर पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या वतीने जस जसे अनलॉक होईल तसे अनेक रेल्वेगाड्या पुर्ववत सुरु कराव्या.

सुधारित वेळापत्रक जाहीर करावे व अहमदनगर पुणे शटल ट्रेन सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी मागील आठ वर्षापासून सदर समिती कार्यरत आहे.

मध्य रेल मुंबई आणि सोलापूर विभागीय रेल्वेने अहमदनगर पुणे इंटरसिटी करिता वेगवेगळे निकष दिले होते. ते सर्व निकष पुर्ण झाले असून, सदर रेल्वे सुरु झाल्यास निश्‍चितच सगळ्यांना फायदा होणार आहे.

या रेल्वेसाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी फेब्रुवारी मध्ये संसदेत प्रश्‍न उपस्थित केला होता. लवकरच हा प्रश्‍न मार्गी निघणार असल्याची आशा व्यक्त करण्यात आली असून या मागणीसाठी पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24