अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची घोषणा अद्यापही पूर्ण झाली नसून सर्वसामान्यांच्या कामांसाठी अथवा बेकायदेशीर कामांसाठी टेबलाखालून पैसे घेण्याची पद्धत महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्याला भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्यांमुळे जिल्हयाला काळे फासले आहे. लाचखोरीत नगर जिल्हा नाशिक विभागात गेल्या नऊ महिन्यांत प्रथमस्थानी राहिला आहे.
लाच प्रकरणात नेहमीप्रमाणे सर्वाधिक गुन्हे महसूल विभागातील अधिकारी, व कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यानंतर पोलीस प्रशासनाचा नंबर लागतो. लाच स्वीकारल्याचे सर्व गुन्हे वर्ग 2 व 3 मध्ये मोडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधातील आहेत.
एकीकडे देशावर कोरोनाचे संकट सुरु आहे, लोकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र या सरकारी अधिकाऱ्यांचे खिशे मात्र कोरोनाच्या काळातही गरमच होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा जमविल्याप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांत 03 लोकसेवकाांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात एक नायब तहसीलदार, एक वन विभागातील अधिकारी तर एका लोकप्रतिनिधीचा समावेश आहे.
यंदा राज्यात प्रथमच नगरमध्ये अपसंपदाप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.आपली कामे करताना सरकारी कार्यालयातील कोणीही लाच मागत असेल तर नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. यासाठी ‘1064’ हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे.
विभागातील दाखल गुन्हे नाशिक – 16 अहमदनगर – 23 नंदूरबार – 06 जळगाव – 18 धुळे – 11
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved