अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात यावे. तालुक्यातील व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या समस्या फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करत जाणून घेत,
त्या सोडवण्यावर भर द्यावा. तसेच कोरोना संकट घालवण्यासाठी प्रत्येकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
एसएमबीटी महाविद्यालय ठिकाणी नगर, नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातून आलेल्या नागरिकांच्या विविध समस्या मंत्री थोरात यांनी जाणून घेत, त्या तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
मंत्री थोरात महसूल मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गटनेतेपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज्यात सांभाळत आहेत. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत प्रभावी काम सुरू आहे.
सातत्याने काम सुरु ठेवून कोरोनामुक्त महाराष्ट्र या अंतर्गत राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवले जात आहे. याची सुरुवात राज्यातून प्रथम संगमनेर तालुक्यातील वाडी – वस्तीपासून करण्यात आली आहे.
प्रत्येक नागरिकाला आरोग्य विषयक माहिती दिली जाणार आहे. कोरोना रुग्णांची तपासणी, कोविड केअर सेंटरच्या सुविधेंसह तालुक्यातील विविध गावच्या समस्या जाणून घेत
मंत्री थोरात यांनी प्रत्येक विभागाला समस्या सोडवण्यासाठी सूचना केल्या. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved