नारायण राणे हद्दपार, त्यांना दुर्बिण घेऊन शोधावे लागेल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी : राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून, त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असे स्पष्ट करत त्यांनी हवं तिथं जावं शिवसेना त्यांना भूईसपाट करण्यास सक्षम असल्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी सांगितले.

कुचिक हे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईभक्त व कर्मचाऱ्यांसंदर्भात ते नेहमी सकारात्मक भूमिका घेत असतात. साई दर्शनानंतर त्यांचा भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डी. डी. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय कामगार सेना चिटणीस विश्वास जगताप, सहचिटणीस शुभम दिघे, भारतीय कामगार सेना युनियन कमिटी मेंबर यांच्यासह कार्यकर्ते तसेच जनसंपर्क विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कुचिक म्हणाले, सध्या भाजपा-शिवसेनेकडे इतर पक्षांची मंडळी येत असून, शिवसेनेकडे येणारी मंडळी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पे्ररित होऊन येत आहेत.

श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे हेदेखील त्यातलेच एक असून, त्यांना शिवसेनेचे विचार पटले आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, त्यांचा प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निश्चित करतील, असे कुचिक यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24