अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सर्जेपुरातील पेट्रोलपंपावर प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रध्वज उलटा फडकल्याची घटना समोर आली आहे. दुपारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपावरील राम ठाकूर नावाच्या कर्मचार्याविरोधात पोलिसांत राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आसिफ निजाम शेख (रा.लेखा कॉलनी, गोविंदपुरा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सर्जेपुरात एसटी वर्कशॉपसमोर फ्रेंड सर्विस स्टेशन (इंडिया ऑईल पेट्रोल पंप) आहे.
तेथे काल झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी राष्ट्रध्वज उलटा फडकला गेला. दुपारी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर शेख यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज हा उलटा फडकावून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.