इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी नवोदय प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यानी प्रवेश अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय येथे अनुक्रमे इयत्ता सहावी आणि नववीसाठी प्रवेश घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठीची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती. इयत्ता पाचवीत शिकत असणार्‍या

विद्यार्थ्यांसाठी ही मुदत आता २२ डिसेंबरपर्यंत तर इयत्ता आठवीत शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) यांनी केले आहे.

प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांनी http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Ahmednagar/en/home/ आणि http://www.navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-class/ या संकेतस्थळाचा वापर करावा. प्रवेश अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

अहमदनगर लाईव्ह 24