पोलिसाचे अपहरण करून मारहाण ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर: पोलीस कर्मचा-याला अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील त्र्यंबके याला आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

नगरसेवक सुनील त्र्यंबके हा महिन्याभरापासून पसार होता. पाईपलाईन रोड येथून नागसेवक त्र्यंबके याला अटक केली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24