लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या झालेल्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  कोरोना विषाणूशी पूर्ण जग लढत आहे. लॉकडाऊन लागल्या पासून तर आजपर्यंत सामान्य जनता सरकारला साथ देत आहे. परंतु सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे.

एकदा काही मदत केली तर ती आयुष्य भर टिकते का? लॉकडाऊन ला विरोध नाही पण सामान्य जनतेचे आर्थिक विचार करून व आपण सरकारतर्फे तात्काळ कशी जनतेची मदत करू शकतो

याचे नियोजन करुन ते अंमलात कसे आणता येईल, याचा अभ्यास करुन लॉक डाऊन करावे. मग सर्व अहमदनगरकर पण तुम्हाला साथ देतील, असे मत एम.आय.एम. जिल्हा अध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी मांडले.

आपली सरकारी यंत्रणा दिवस रात्र काम करत आहे परंतु आपण कुठे कमी पडत आहे यावर विचार करणे गरजेचे आहे. पहिले 3 महिने कडेकोट लॉक डाऊन असताना अचानक रुग्ण कशे वाढले आपण कुठे कमी पडलो आपल्याला पुढची रणनीती कशी बदलावी लागेल यावर चर्चा करणे गरजेचे आहे.

मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि सध्या आजारात जनतेचे काय हाल होत आहे याची पूर्ण मला जाणीव असल्याचे सांगून अहमदनगर जिल्हा व शहरात जनता कर्फयु लागू करण्याची मागणी काही लोक करीत आहे.

आणि लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असेही बोलण्यात येते. सामान्य जनतेचे लॉकडाऊन आणि कोरोनामुळे काय परिस्थिती झाली आहे; जरा याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

लॉकडाऊनचे काळात जनता कोण कोणत्या संकटातून गेली व आत्ता कोणत्या संकटात आहे हे पाहणे गरजेचे आहे. साधा मास्क वापरत नसेल तर प्रशासन मास्क विकत घेऊन न देता पाचशे रुपयेची दंडाची पावती फाडतात,

काही कामानिमित्त संध्याकाळी बाहेर पडले तर कर्मचारी अडवून पावती फडण्याास सांगत आहे, त्यांना बाहेर पडण्याचे योग्य कारण सांगितले तरी हेल्मेट नाही घातल्यामुळे पावती फाडवी लागेल, अशी अडवणूक करतात.

जसे त्यांना दिवसाची ठराविक रक्कम कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयात चेहरे पाहून अ‍ॅडमिड करायचे की नाही ठरवले जातात.

सामान्य जनतेचे वीज बिल माफ करण्याचे सोडून सरासरीच्या नावावर दुप्पट शुल्क आकारले जात आहे. एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाईल असे पालिका सांगते परंतु दोन-दोन,

तीन-तीन दिवस तर काही भागात पाच-पाच दिवस पाणी पुरवठा होत नाही परंतु घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण वर्षाची लावण्यात येते. भरली नाही तर शास्ती करच्या नावावर दर महिन्याला कर आकारला जातो.

लॉकडाऊन काळात पालिका अतिक्रमण काढण्यास जास्त महत्त्व देत आहे. दररोज प्रवास करणार्‍या जनतेला येण्या जाण्यासाठी किती हाल होत आहे कधी गाडी मिळते कधी तासोंतास गाडी भेटत नाही.

रिक्षा, टमटम सारख्या गाडीवर जीवन जगणार्‍या कुटुंबाला तर रोजचे घर चालवणे अवघड झाले आहे. खाजगी नोकरी करणार्‍याांना काही कारण ना सांगता कामावरून काढून टाकण्यात येत आहे.

त्या कुटुंबाला उपासमारीची वेळ यामुळे आली आहे. असे एक ना अनेक प्रश्‍न सामान्य जनतेचे आहे ज्यावर सरकारने विचार करून ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे.

देशाचे प्रधानमंत्री यांनी कोरोनाशी लढणार्‍यांसाठी आपल्याला घरी रहावे लागेल तरच आपण कोरोना विषाणूवर मात करू शकतो, असे आवाहन देशातील जनतेला केले. जनतेने या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहिले व सरकारला साथ दिले.

परंतु या लॉकडाऊन काळात सामान्य जनतेची काय आर्थिक परिस्थिती झाली किंवा होत आहे यावर सरकारने कधी लक्ष केंद्रित केले का?

सरकारने जे वीस लाख करोडचे कोरोना पॅकेज जाहीर केले त्याचा फायदा सामान्य जनतेला कितपत झाला? असा प्रश्‍नही त्यांनी यानिमित्त उपस्थित केला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24