इम्रान खानची आदळआपट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर जागतिक मंचावर एकाकी पडलेल्या पाकच्या पंतप्रधान इम्रान खान यांची आदळआपट अजूनही सुरूच आहे. काश्मीर मुद्यावर मुस्लिम नेत्यांचे समर्थन मिळविण्यासाठी धडपड करत असलेल्या खान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भारत दौऱ्यापूर्वी त्यांना अचानक फोन करत या मुद्यावर चर्चा केली.

शेख हसिना चार दिवसीय भारत दौऱ्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाल्या.भारताच्या दिशेने निघण्याच्या काही तास अगोदर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेख हसिना यांना अचानक फोन केला. काश्मीर मुद्यावरून खान यांनी हसिना यांना फोन केल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील विविध देशांनी या मुद्यावरून अनेक वेळा खान यांना सुनावलेले असताना सुद्घा ते सातत्याने काश्मिरी राग आळवत आहेत.

खान यांनी फोनवर बोलताना हसिना यांच्या प्रकृती आणि डोळ्यांची चौकशी केली. याबद्दल हसिना यांनी खान यांचे आभार मानले, अशी माहिती हसिना यांचे प्रेस सचिव एहसान उल करीम यांनी दिली. हसिना यांच्या डोळ्यांवर नुकतेच लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या वर्षी सत्तेत आलेल्या खान यांनी प्रथमच हसिना यांच्यासोबत अशा प्रकारची चर्चा केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24