मंत्र्याच्या घरी बाॅम्ब ठेवल्याची अफवा; एकास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुद्दुचेरी:- पुद्दुचेरीचे सार्वजनिक बांधकाममंत्री ए. नमासीवायम यांच्या निवासस्थानी बाॅम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्री पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून नमासीवायम यांच्या निवासस्थानी बाॅम्ब ठेवला असल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी निवासस्थानाची तपासणी केली, पण तेथे काहीही आढळले नाही. बाॅम्बची माहिती खोटी आहे हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्याला गुरुवारी रात्री उशिरा कलपेट भागातून अटक करण्यात आली.

त्याचे नाव भुवनेश (१९) असे असून तो तामिळनाडूच्या विलिप्पुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. भुवनेशने अलीकडेच मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आणि लोककल्याणमंत्री कांडासामी यांच्या निवासस्थानीही बाॅम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24