….आणि महाजन व विखे पाटील एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईला गेले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी सायंकाळी नगर शहराजवळील विखे फौंडेशनच्या आवारातून एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे उड्डाण केले.

राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर डॉ. विखे यांनी काल, शुक्रवारी महाजन यांची जळगावमध्ये जाऊन भेट घेतली होती.

त्यानंतर लगेच महाजन शनिवारी दुपारी नगरमध्ये आले होते, त्यांनी जिल्ह्य़ातील पक्षाच्या आमदारांशी बंद खोलीत चर्चा केली.

नंतर महाजन व आ. शिवाजी कर्डिले खासगी मोटारीने, शहरापासून दूर असलेल्या विखे फौंडेशनकडे रवाना झाले, तेथे डॉ. विखे व हेलिकॉप्टर तयारच होते, लगेच महाजन व डॉ. विखे असे दोघेच हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Sujay Vikhe