हल्लीच झालेल्या एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, काही वेळ नुसते उभे राहूनही आपण लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांची जोखीम कमी करू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, उभे राहून आपण दर सहा तास बसून वा झोपून राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत सुमारे ४५ कॅलरी घटवू शकतो.
जीवनशैलीत किरकोळ बदल करून व्यक्ती गतीहीन जीवनशैलीच्या दुष्परिणामांपासून स्वत:चा बचाव करू शकतो. जास्त धावपळ करण्याऐवजी केवळ काही वेळ उभे राहिले तरीही लठ्ठपणा व टाइप२ मधुमेहासारख्या आजारांची जोखीम कमी करू शकतो व शरीराला अन्य रोगांपासून वाचवू शकतो. शास्त्रज्ञांनी या अध्ययनासाठी ५३ लोकांची दोन गटात (ऊर्जा खर्च करणारे व ऊर्जा वाचविणारे) विभागणी केली.
ऊर्जा वाचविणारे आपल्या हालचालींतून फारच थोडी ऊर्जा खर्च करत होते. त्यामुळे त्यांच्यात बसणे, झोपणे व उभे राहणे यांच्यात शून्य फरक दिसून आला. अध्ययनादरम्यान असे दिसून आले की, ज्या लोकांनी आपली ऊर्जा उभे राहून खर्च केली, त्यांनी बसून राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत दहा टक्के जास्त कॅलरी खर्च केल्या.
त्याचा सर्वात जास्त प्रभाव स्नायूंमध्ये पाहण्यास मिळतो. जे लोक जास्त सक्रिय असतात, त्यांच्या स्नायूंमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. लठ्ठपणा व मधुमेहासारखे आजार दूर ठेवायचे असतील तर बसून न राहता भले काम करणे शक्य नसले तरी थोडा वेळ उभे राहवे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.