श्रीरामपूर – शहरातील हॉटेल उदय पॅलेससमोर मुलीची छेड काढणाऱ्यास पोलिसांनी काकडी (ता. राहाता) येथून पकडून आणले.
तरुण तालुक्यातील खानापूर येथील आहे. मात्र, ज्या मुलीची छेड काढली तिने तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांना पुढील कारवाईस अडचणी येत आहे.
त्यामुळे तक्रारीसाठी पुढे येण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. ही घटना सिद्धीविनायक गणपती मंदिराजवळ घडली. यावेळी मुलीने हिमत दाखवित सदर टारगटाला चांगला चोप दिला.
यावेळी घटनास्थळी उपस्थितांनीही त्याला हाताखालून काढले. पोलिसांनी मध्यस्थी करत त्याला ताब्यात घेतले.