तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या पतीला दोन्ही बायकांनी शिकविली अद्दल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोईम्बतूर : तिसऱ्या लग्नासाठी मुलीचा शोध घेणाऱ्या पत्नीला दोन्ही पत्नींनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये घडली आहे. दरम्यान, तो व्यक्ती लग्नानंतर पत्नीला हुड्यांची मागणी करून त्रास देत होता आणि न दिल्यास त्यांना मारहाण करत असे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

सूलूरमधील नेहरू नगरमध्ये राहणारा एस. अरंगन उर्फ दिनेश राहतो आणि एका खासगी कंपनीत काम करतो. त्याचा २०१६ ला त्रिपूर जिल्ह्यातील गनपथपलायम येथील प्रियदर्शिनी या मुलीसोबत पहिला विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतरच त्यांने हुड्यांची मागणी करत पत्नीला त्रास देण्यास सुरूवात केली. तसेच तो सतत मारहाण करत असे.

या त्रासाला कंटाळून प्रियदर्शिनी दिनेशला सोडून आई-वडिलांकडे निघून गेली होती. त्यानंतर दिनेशने विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटच्या मदतीने अनुप्रियाशी लग्न केले. अनुप्रिया करूर जिल्ह्यातील असून तिचे हे दुसरे लग्न आहे. तिला दोन वर्षांचा एक मुलगा आहे. या दोघांचा काही दिवस चांगला संसार सुरू होता.

त्यानंतर पुन्हा १० एप्रिल २०१९ ला अनुप्रियाला हुड्यांची मागणी करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्या त्राला कंटाळून अनुप्रियाही आपल्या वडिलांकडे राहण्यासाठी दिनेशला सोडून गेली. त्यानंतर दिनेशने विवाह जुळवून देणाऱ्या वेबसाइटवर तिसऱ्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू केला.

याची माहिती मिळताच प्रियदर्शिनी आणि अनुप्रिया सोमवारी दिनेशच्या कंपनीत पोहोचल्या. त्यांनी दिनेशला भेटण्याची मागणी केली. मात्र, कंपनीने दिनेशला बाहेर पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर त्या दोघींनी तेथेच धरणे सुरू केले. त्यानंतर कंपनीने दिनेशला बाहेर पाठवले. दिनेश बाहेर येताच दोघींनी त्यांची धुलाई केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24