तरुणाच्या मृत्यूनंतर लावले सलाईन!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

झासरगुडा : विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याला परिचारीकेने सलाईन लावल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने सलाईन लावेपर्यंत तरुण जिवंत होता अशी सारवासारव केली आहे.

आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झासरगुडा जिल्ह्यातील लाईखेरा ब्लॉकमध्ये मोडणाऱ्या जलीबहाल गावात रहाणारा खेत्रामणि किशन (३०) याने विष प्राशन केले. त्याला कुटुंबियांनी तातडीने झासरगुडा जिल्हा रुग्णायलात दाखल केले. 

बुधवारी त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर त्वरीत उपचार झाले नाहीत. काही वेळानंतर त्याचे निधन झाले. त्यानंतर रुग्णालयातील परिचारीका त्याला सलाईन लावत होती. हा प्रकार खेत्रामणिचा भाऊ छत्रालाल याने मोबाईलमध्ये कैद केला. खेत्रामणिला तपासणाऱ्या डॉ. तनूजा पत्रा यांनी सांगितले की, त्याला मृत घोषित केले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते.

 मी त्याच्यावर उपचार सुरु केले त्यावेळी तो शुध्दीवर होता. त्याचा रक्तदाब खूप कमी होता. मी त्याला मृत घोषित केले नसल्याने परिचारीका तिचे नेमून दिलेले काम करत होती. त्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी तक्रार आली. त्याची तपासणी केल्यावर मृत घोषित केले.

 या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयाचे डीन डोलामणि पटेल यांनी सांगितले की, खेत्रामणिला मृत घोषित केल्यानंतर त्याला कुठलेही इंजेक्षन दिलेले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24