चोराने मनगटातून लांबविले सहा कोटींचे घड्याळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका चोराने जपानी उद्योजकाला हिसका दाखवत त्याच्या हातातूवन तब्बल सहा कोटी रुपयांचे हिरेजडित घड्याळ बेमालूमपणे लांबविले. हा उद्योजक हॉटेलमधून बाहेर पडत होता. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या चोराने त्याच्याकडे सिगारेट मागितली. ३० वर्षीय उद्योजकाने खिशातून सिगारेट काढत असताना चोराने झटका देत त्याच्या हातातून घड्याळ खेचले व धूम ठोकली.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्याआधारे पोलीस आता या चोराचा शोध घेत आहेत. चोराची छायाचित्रे सर्वत्र पाठविण्यात आली असून घड्याळाच्या विक्रीसंबंधी बाहेर येणाऱ्या बातम्यांवर नजर ठेवली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चोराने लांबविलेले घड्याळ स्वीत्झर्लंडमधील आलिशान ब्रँड रिचर्ड मिलचे टूरबिलियन डायमंड ट्विस्टर आहे.

फ्रान्समधील चोराची नजर देशात फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्य महागड्या घड्याळांवर असते. त्यामध्ये रॉलेक्स, कार्टियर ब्रँडची घड्याळे मुख्य असतात. फ्रान्सच्या बाजारात रॉलेक्स व कार्टियर घड्याळे कागदपत्रांशिवाय सहजपणे विकली जातात. त्यातून चोरांना ४४ लाख ते ३ कोटी रुपयांपर्यंत रक्कम सहजपणे मिळते. पॅरिसमध्ये ब्रँडेड घड्याळ चोरांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24