राहुरी :- तालुक्यातील कोंढवड येथे आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह मुळा नदीपात्रात आढळून आला. शुभम किशोर बनसोडे (वय २०) असे या तरूणाचे नाव आहे.
शुभमचे मुळगाव सलाबतपूर (ता. नेवासा) असून तो आई व बहिणीसह मामाच्या घरी कोंढवडला राहत होता.
तो राहुरी महाविद्यालयात बी. कॉमच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. आज सकाळी साडेसहा वाजता शुभमचा मृतदेह मुळा नदीपात्रात पाण्यावर तरंगताना आढळला.
याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.