दक्षिणेचा घोळ दोन दिवसात मिटणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा घोळ अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. होळीनंतरच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा घोळ मिटणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. 

आचारसंहिता जारी होऊन दहा दिवस उलटले असले, तरी या मतदारसंघातून कुठल्याच पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने संभ्रम वाढला आहे.

भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर होण्यास विलंब लागत असल्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 

आचारसंहिता लागल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश केला आहे.

त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असली, तरी विद्यमान खासदार दिलीप गांधी हेही उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. 

भाजपमध्ये उमेदवारी निश्चित होत नसताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवारीचा घोळ मिटलेला नाही. होळीनंतरच उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24