कोपरगाव :- विवाहितेचा मोटारसायकलीवरून पाठलाग करून तिच्या साडीचा पदर ओढून अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्यावर कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
‘तू माझ्या गाडीवर बसली नाही, तर वाईट परिणाम होतील,’ अशी धमकीही या तरूणाने दिली. या प्रकरणी अविनाश ज्ञानदेव आहेर (वय ३२, श्रीकृष्ण मंदिर गल्ली, मुखेड, हल्ली मुक्काम अन्नपूर्णानगर,कोपरगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.