कोपरगाव :- शहरातील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या सुनील बागले (वय ३८) यांचा मृतदेह २० फेब्रुवारीला तालुक्यातील शिंगणापूर शिवारात रेल्वेरुळावर आढळून आला.
कोपरगावचे रेल्वेस्टेशन मास्टर विजयपाल सिंग यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बागलेचे नातेवाईक, मित्र परिवाराने तेथे मोठी गर्दी केली होती.