अहमदनगर :- महिलांचे सौंदर्य, अदाकारी, कलागुण व बुध्दीमत्तेच्या कसोटीवर आधारलेल्या व मॉडलिंग क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्या महिला व युवतींना एक व्यासपिठ निर्माण करुन देण्याच्या हेतूने तसेच सर्वसामान्य महिलांना मॉडलिंग क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी पेज थ्री मॉडलिंग इन्स्टिट्यूट व बीयू इव्हेंटच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी मिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी नुकतेच शहरातील हॉटेल वी स्टार मध्ये ऑडिशन घेण्यात आले. याला शहरातील महिला व युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मागील वर्षी घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या सीजन 1 मध्ये शहरासह जिल्ह्यातील युवती व महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला होता.
या वर्षी महिला व युवतींमध्ये स्पर्धेची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली असून, मिस व मिसेस अहमदनगर 2019 चा मुकुट पटकाविण्यासाठी चढा-ओढ लागली आहे. तसेच इतर तालुक्यात देखील ऑडिशन घेण्यात येणार असून, श्रीरामपूर येथे दि.25 फेब्रुवारी रोजी हॉटेल योगेश येथे ऑडिशन घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सर्व महिलांना सहभागी होता यावे यासाठी महिलांची उंची, शरीरयष्टी या अटी शिथल करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक स्वप्नाली जंबे, फरिद सय्यद, अफरोज शेख यांनी दिली आहे.
महिलांच्या आग्रहाखातर शहरात पुन्हा ऑडिशन घेण्याची मागणी करण्यात आली असून, लवकरच शहरात पुन्हा ऑडिशन घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ऑडिशनसाठी परिक्षक म्हणून मिसेस इंडिया ग्रेसफुल 2018 भक्ती मते व मिसेस अहमदनगर 2014 चे स्वाती अट्टल काम पाहत आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या महिला व युवतींना 8600298538, 9823939371 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. 8 मार्च रोजी ग्रॅण्ड फिनाले शो मध्ये ऑडिशनमध्ये पात्र ठरलेल्या महिला रॅम्पवर अवतरणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना प्रोफेशनल रॅम्प वॉक, ग्रुमिंग, संवाद कौशल्य याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.