एवढी आहे चिदंबरम यांची संपत्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली :- आतापर्यंतच्या रिपोर्टनुसार, चिदंबरम यांच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे आणि पत्नीकडे जवळपास 95.66 कोटींची संपत्ती आहे. त्याचबरोबर त्याच्यावरही पाच कोटी रुपयांचं कर्ज आहे.

देशातच नाही तर विदेशातही त्यांचे अनेक बंगले आणि कोट्यावधींची संपत्ती आहे. यामध्ये कोटींची एफडी आणि वार्षिक उत्पन्न 8.6 कोटी इतकं आहे. ही चिदंबरम यांची कौटुंबिक संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबाकडून घोषित केलेल्या संपत्तीनुसार चिदंबरम यांच्याकडे एकूण 175 कोटी आहे.

4 वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत या मालमत्तेचा खुलासा करण्यात आला होता. दुसरीकडे मुलगा कार्ती चिदंबरम यांनी आपली संपत्ती 80 कोटी रूपये जाहीर केली आहे. 2014-15मध्ये त्यांनी 8.5 कोटी इतकं उत्पन्न दाखवलं होतं. तर त्यांच्या पत्नीचं 1.25 कोटी इतकं उत्पन्न आहे.

चिदंबरम यांची मालमत्ता

– चिदंबरम यांच्याकडे पाच लाखांची रोकड असून बँका आणि अन्य संस्थांमध्ये 25 कोटी रुपये जमा आहेत.

– 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स इत्यादी आहेत. तर पोस्ट ऑफिस योजनांमध्ये सुमारे 35 लाख रुपये जमा आहेत.

– दहा लाख रुपयांची विमा पॉलिसी, 27 लाख रुपयांची वाहनं आणि 85 लाख रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

– त्याची सर्वात मोठी ठेव 20 कोटी आहे तर सर्वात कमी 3 हजार रुपये आहे.

– यांसह, यूकेमधील केंब्रिजमध्ये 1.5 कोटींची मालमत्ता, 7 कोटीची शेतजमीन, 45 लाखांच्या व्यावसायिक इमारती आणि 32 कोटींच्या घरांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24