मोदींच्या मंत्रिमंडळात होणार बदल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये मित्रपक्षांच्या मंत्र्यांचा मोठ्या संख्येने समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या वर्षी 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांचा पंतप्रधान झाले. यावेळी मोदीं यांनी बनविलेल्या नव्या मंत्र्यांच्या टीममध्ये जेडीयू पक्षाचा एकही मंत्री नव्हता.

यासोबतच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला देखील एक प्रकारे प्रतिकात्मक प्रतिनिधीत्व मिळाले होते. मित्रपक्षांच्या कोट्यामधून आणखी काही मंत्र्यांची वर्णी मंत्रिपदावर लागू शकते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या कार्यकालात मंत्र्यांनी आतापर्यंत किती काम केले. या सर्व कामांची समीक्षा करणार आहेत. या आधारावर मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24