अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर परिसराचा विकासात्मक दिशेने कायापालट होत आहे. रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम केले असून, या भागातील विकास कार्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 मधील शाह शरीफ दर्गा रोड व मुल्ला कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, फारुक शेख, वाहिद हुंडेकरी, समीर खान, बाबा खान, अजिंक्य बोरकर, नसीम शेख, दत्ता तापकिरे, मन्सूर सय्यद, साहेबान जहागीरदार, जुनेद खान, अक्रम शेख, इमरान शेख, सागर पारडे, शहेबाज शेख, हाजी टिंकू खान, सोहेल खान, मजर खान, वसीम पठाण, वसीम सय्यद, मज्जू शेख आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आ. जगताप म्हणाले की, मुकुंदनगरच्या विकासासाठी नगरसेवक समद खान यांचा सातत्याने प्रयत्न चालू असतो. या उपनगरात शहराच्या धर्तीवर सोयी-सुविधा पुरविण्यास आपण प्रयत्नशील असून, येथील रस्ते मॉडेल स्वरुपात दिसणार आहे. तर इतर विकासकामे देखील मार्गे लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
नगरसेवक समद खान म्हणाले की, मुकुंदनगरचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन कार्य चालू आहे. सातत्याने केलेला पाठपुरावा व आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून मंजुर झालेले कामे यामधून या भागाचा विकासात्मक बदल दिसून येत आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुकुंदनगर भागातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे नगरसेवक समद खान यांचा नागरिकांनी जाहिर सत्कार केला.