कोपरगाव: वेळापूर येथील ग्रामसेवक व सरपंचाने संगनमताने शासनाच्या योजनेतील २ लाख ३२ हजारांची पाण्याची टाकी न बांधता केवळ १ लाखात काम करुन १ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चौदाव्या वित्त आयोगाच्या २ लाख ३२ हजारांतून शिंदेवस्ती वेळापूर येथे पाण्याची टाकी बांधायची होती. कोणतेही काम न करता ग्रामसेवक विनोद गिरीधर माळी, सरपंच गणपत नामदेव वाघ यांनी पदाचा गैरवापर करून ठेकेदार सुनील माधव गुंजाळ यांना १ लाखाचा धनादेश देऊन रक्कम काढून घेतली.
या प्रकरणी विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी फिर्याद दिल्यानंतर दोघांवर संगनमताने फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.