अहमदनगर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका यांच्या वतीने जनाधार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे अँड सुनिल आठरे व पदाधिकार्चायांचा सम्मान करण्यात आला.
पत्रकारांवरील वाढते हल्ले तसेच विरोधात बातमी केल्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणात वाढ झालेली असून अनेकदा पत्रकारांना आर्थिक पाठबळ नसल्याने पत्रकारांना न्याय मिळत नाही पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून प्रत्येक क्षेत्रातून पत्रकारांना आपल्यापरीने मदत करायला हवी आम्ही जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघातील पदाधिकारी व सदस्य यांच्यावर यापुढील काळात दाखल होणारे गुन्हे तसेच मारहाण याबाबत न्यायालयात दाखल होणारे सर्व संघटनेमार्फत लढवणार असल्याचे प्रकाश पोटे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ॲडव्होकेट सुनील राठोड म्हणाले ग्रामीण पत्रकारांना नेहमीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ग्रामीण पत्रकार हा ग्रामीण भागातील समस्यांना घेऊन वाचत असतो मात्र अनेकदा समाजकार्य करताना त्यांच्यावर झालेले खोटे गुन्हे असे प्रकार घडले आहेत.
नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकारांवर होणारे खोटे गुन्हे मारहाण याबाबतचे न्यायालयीन जे खटले असतील ते आम्ही यापुढे मोफत लढवणार आहोत ,समाजासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या पत्रकारांसाठी आम्ही केलेल्या या उपक्रमाची सुरुवात नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले.
यावेळी जन-आधार सामाजीक संघटनेचे सागर बूट बोडखे, अमित गांधी, दिपक गुगळे,सुशांत नहार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे नगर तालुका अध्यक्ष तुकाराम कामठे ,उपाध्यक्ष खासेराव साबळे, सचिव सोहेल मनियार,खजिनदार निलेश आगरकर,कार्याध्यक्ष जयसिंग यादव, प्रसिद्धीप्रमुख साबीर सय्यद,पत्रकार रवि कदम,अशोक तांबे,अन्सार शेख,विजय गोबरे,रफिक शेख,शाम कांबळे,शिवा म्हस्के,भारत पवार,रियाज शेख,विनोद सुर्यवंशी ,महादेव गवळी आदि पत्रकार उपस्थित होते.