अहमदनगर :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दुपारी अचानक पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बाजी मारली आहे.
दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर आज अचानक थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेतली. भेटीबाबतचा तपशील समजू शकला नाही.
रविवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाचे दफ्तरी कामकाज बंद असते. मात्र विरोधीपक्षनेते विखे भेटीस येणार असल्याने सिंधू हे कार्यालयात उपस्थित राहिले होते..