कंगनाने हृतिक रोशनबद्दल केले हे वक्तव्य !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नावच घेत नाही. पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा कंगनाने आपला राग व्यक्त करत एक वक्तव्य केलं आहे. 

कंगना रानौत आपल्याकडून हृतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता कंगनाने असं काही वक्तव्य केलंय की, ते ऐकून हृतिक देखील शांत बसणार नाही. कंगना म्हणाली की, जर ती हृतिक रोशन असती तर गप्प बसली नसती. 

बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, कंगना एका कार्यक्रमात गेली तेव्हा तिने हे वक्तव्य केलं आहे. कंगना रानौतला विचारलं की, जर तुला एक दिवसाचा हृतिक रोशन केलं तर तू काय करू इच्छिते.

उत्तर देताना कंगना म्हणाले, आमच्या दोघांमध्ये जे काही झालं. किंवा आम्ही दोघांनी एकमेकांसोबत जे काही केलं त्यानंतर मी हृतिक असती तर कंगनाला फोन केला असता. आणि म्हटलं असतं की, मी तुझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी ‘सॉरी’.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24