जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली.
गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे.
तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.