एकाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नेवासा : तालुक्यातील देडगावला शेषराव पांडुरंग मोरे (वय ५८) यांचा खून करण्यात आला. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध नेवासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

संभाजी शिवाजी थोरात, लक्ष्मण एकनाथ ऐडके (दोघे रा. देडगाव, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत गणेश शेषराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि. ७) रात्री आठ वाजेच्या सुमारास मी व भाऊ रमेश मोरे तसेच गावातील माझे मित्र देडगावच्या स्टॅन्डवर गप्पा मारत होतो.

त्यावेळी गावातील संभाजी थोरात याच्या दुचाकीवर वडील शेषराव मोरे व त्यांच्या पाठीमागे लक्ष्मण ऐडके असे तिघेजण तेलकुडगाव रस्त्याने जाताना दिसले होते. त्यानंतर मी व भाऊ आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. ८) सकाळी सात वाजता झोपेतून उठल्यानंतर वडील घरात दिसले नाही.

आई, आजी, आजोबा, भाऊ यांच्याकडे विचारपूस केली असता ते घरी आले नसल्याचे समजले. त्यामुळे मी, भाऊ रमेश व इतर नातेवाईकांनी वडिलांचा गावात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. त्यामुळे ते रात्री थोरात व ऐडके यांच्याबरोबर जाताना पाहिले होते. ऐडके याचे घर त्याच रस्त्याला असल्याने आम्ही लक्ष्मण ऐडके याच्या घरी गेलो.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24