अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही.
त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते.
मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. पर्यायाने फुलांना चांगला दर मिळणार आहे.