एलईडी टीव्ही होणार स्वस्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : देशांतर्गत टीव्ही उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एलईडी टीव्ही उत्पादनात वापरात येणाऱ्या ओपन सेल टीव्ही पॅनेलवरील ५ टक्के आयात शुल्क हटवले आहे. यामुळे ओपन सेल टीव्ही पॅनेल आयातीवर यापुढे कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही.

अर्थमंर्त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अधिसूचनेच्या माध्यमातून हे शुल्क हटवले आहे.. ओपन सेल टीव्ही पॅनेलचा उपयोग एलईडी आणि एलसीडी टीव्ही उत्पादनात केला जातो. सरकारच्या या निर्णयामुळे टीव्ही पॅनेल ३ टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत.

ओपन सेल पॅनेल टीव्ही उत्पादनासाठी लागणारा एक अत्यंत आवश्यक भाग आहे. टीव्ही उत्पादन खर्चात या पॅनेलचा हिस्सा अध्र्याहून अधिक असतो. केंद्रीय अर्थमंर्त्यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार एलसीडी आणि एलईडी टीव्ही निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ओपन सेल टीव्ही पॅनेलवर (१५.६ इंच आणि त्यापेक्षा मोठे) कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

सरकारने या व्यतिरिक्त चीप ऑन फिल्म, प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली(पीसीबीए) आणि सेल (ग्लासबोर्ड/सबस्ट्रेट) यावरील आयात शुल्कदेखील हटवले आहे. हे भाग ओपन सेल टीव्ही पॅनेल निर्माण करण्यासाठी वापरले जातात.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24