छावणी बंद केल्याने शेतकऱ्यांत असंतोष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शेवगाव : तालुक्यातील नांदुर विहीरे येथे श्री शनैश्वर सामाजिक संस्था निंबेनांदुर संचलित जनावरांची चारा छावणी निंबेनांदुर येथे सुरु आहे.मात्र छावणी चालकाने प्रशासनाच्या आदेशानुसार जनावरांची छावणी बंद करण्याच्या मनस्थितीत असल्याने निंबेनांदुर येथील शेतकऱ्यांमधे असंतोष निर्माण झाला आहे.

पशुपालकाने अशी मागणी केली आहे की, निंबे व नांदुर या दोन्ही महसूल सजामधे अत्यंत कमी प्रमाणात पाउस झालेला असल्याने एकाही शेतकऱ्यांच्या घरी आजमितीला जनावरांना खाण्यासाठी कोणत्याच प्रकारचा चारा उपलब्ध नाही.

त्यामुळे जनावरांची उपासमार होणार आहे. म्हणून छावणीतील शेतकऱ्यांनी छावणी चालकाकडे जनावरांची छावणी बंद करू नये, अशी लेखी मागणी खालील शेतकऱ्यांनी केली आहे. नानाभाऊ खोसे, सुभाष पुंडे, संतोष पुंडे.

सोमीनाथ पावले, जगन्नाथ चेके, भागिनाथ चेके, शिवाजी पुंडे, साईनाथ यादव, लक्ष्मण यादव, भानुदास बडे, मारुती खोसे, सोमीनाथ खोसे, गोरक्ष पुंडे, दिलीप खाटेकर, धोंडीराम यादव, ॲड.रोहीत बुधवंत, आदिनाथ खोसे, आप्पासाहेब खोसे, लक्ष्मण चेके या शेतकऱ्यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24