भांडखोर नवऱ्याने छाटले पत्नीचे नाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लाहोर : पाकिस्तानमध्ये भांडखोर नवऱ्याने रागाच्या भरात चाकूने पत्नीचे नाक आणि डोक्यावरील केस छाटल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांकडून तिच्यावर कृत्रिम नाकाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाझियाचा नवरा सज्जाद अहमद हा तिला सातत्याने मारहाण करायचा. लोखंडाची सळई आणि मिळेल त्या वस्तूने तो शाझियाला मारायचा.

बऱ्याच वेळेला शेजाऱ्यांनीच या दोघांचे भांडण सोडविले होते; परंतु सोमवारी किरकोळ कारणावरून सज्जादने पत्नीला बेदम मारहाण करत चाकूने तिचे नाक छाटले. सोबतच तिचे टक्कलदेखील केले.

भांडणाची आरडाओरड ऐकून जमा झालेल्या शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत सज्जाद फरार झाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24