नगर : शहरातील खासगी, तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. हवामानात झालेला बदल, ढगाळ वातावरण व डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे प्रमाण अधिक आहे.
बहुतांश रुग्णांमध्ये विषाणूजन्य तापाचे प्रमाण आढळून येत आहे. डेंग्यू व मलेरियासह गोचिड तापाचेही रुग्ण आहेत. जिल्ह्यात मागील महिनाभरात डेंग्यूचे सुमारे ४९ रुग्ण आढळून आले आहेत.
नगर शहरातही या आजाराचे ३९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणासह विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.