आता चेहरा ओळखून होतेय पेमेंट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बीजिंग : भारतामध्ये सध्या डिजिटल पेमेंटवर जास्त जोर दिला जात आहे. त्यासाठी स्मार्टफोनचा वापरही वाढत आहे. पेटीएम, फोनपे, गुगलपे, मोवी क्विकसारखे अनेक स्मार्टफोन ॲप डिजिटल पेमेंटसाठी उपलब्ध आहेत.

मात्र चीनने याबाबतीत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. तिथे रोख रक्कम वा कार्ड पेमेंट सोडाच, स्मार्टफोन आणि डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट करण्याची पद्धतही जुनी ठरू लागली आहे. फेशियल पेमेंट स्व्हिहस ते त्यामागचे कारण आहे.

चीनमध्ये लोक वस्तू खरेदी करतात आणि आपल्या चेहऱ्यामार्फत पैशांचा भरणा करतात. चीनची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे फायनान्सशियल आर्म अली-पे या पेमेंट सेवेमध्ये अग्रेसर आहे. चीनच्या सुमारे शंभर शहरांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

अली-पे हे तंत्रज्ञाना लागू करण्यासाठी पुढील तीन वर्षांत सुमारे ४२ कोटी डॉलर खर्च करणार आहे. खरेदीनंतर लोक कॅमेऱ्यासोबत जोडलेल्या पीओएस मशीनसमोर उभे राहतात व पेमेंट करतात. त्यासाठी त्यांना पहिल्यांदा आपला चेहरा बँक खाते वा डिजिटल पेमेंटसोबत लिंक करावा लागतो.

चीनमध्ये सुमारे वर्षभरापूर्वी ही सेवा सुरू झाली व आता तिचा विस्तार शंभर शहरांमध्ये झाला आहे. फेशियल रेकॉग्शिन सॉफ्टवेयरचा पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. लोकांवर नजर ठेवण्यासाठी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्याची मोठी मदत होते. आता त्याचा पेमेंट प्रक्रिया सुलभ बनविण्याासठी वापर केला जाऊ लागला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24