नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्याने शेतातील पीक वाया गेले आहे.
त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील ठिबक सिंचनाच्या पाइपच्या सह्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.