विधानसभा निवडणुकीच्या वादातून राडा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत : विधानसभा निवडणुकीच्या वादातून कर्जत तालुक्यात राडा झाला असून, यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोमवारी संध्याकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास धांडेवाडी येथे घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत कर्जत तालुका भाजपचे अध्यक्ष अशोक खेडकर यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी धांडेवाडी येथे बैठक झाली.

बैठकीनंतर बाहेर पडत असताना धांडेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऋषिकेश धांडे, विलास धांडे व इतर तीनज़णांनी तू इथे प्रचाराला का आलास, असे म्हणत धक्काबुक्की व शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांच्यावर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ऋषिकेश धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर व त्यांचे सहकारी युतीचे उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी धांडेवाडी येथे आले असता, त्यांनी धाक दाखवत तू भारतीय जनता पक्षाचा प्रचार कर, असे म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24