नेवासे :- खडकेफाटा टोलनाक्यावर गुरुवारी रात्री फॉर्च्युनर कारमधून एक लाख रुपये व रिव्हॉल्व्हर आचारसंहिता कक्षाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केले.
औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या फॉर्चूनरची (एमएच ४३ एआय ००१३) तपासणी एस. डी. कराळे यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल चांगदेव कांबळे, जी. एस. चव्हाण, नितीन भताने यांनी केली असता एक लाखाची रक्कम आढळली. एकाकडे रिव्हॉल्व्हर सापडले.
पथकाने लगेच निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे, तहसीलदार रुपेश सुराणा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख यांना बोलवले. पंचनामा करून रक्कम व रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले.