रेल्वे स्थानकांवर मिळणार मोफत वायफाय!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24