गणपती विसर्जनाची मिरवणूक वादातून जातीवाचक शिविगाळ करत तलवारीने मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : घरासमोरून गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना फटाके वाजवू नका घरातील लहान नात घाबरेल असे म्हणाल्याचा राग येवून जातीवाचक शिवीगाळ करत काठ्या, तलवार, लोखंडी पाईपने एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रंगनाथ बाबुराव बोरुडे (रा. आगडगाव, ता.नगर) यांच्या घरासमोरून गावातील गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना मिरवणुकीतील लोकांनी त्यांच्या घरासमोर फटाके वाजवले. तेव्हा बोरुडे यांनी तुम्ही घरासमोर फटाके वाजवू नका, माझी नात लहान आहे ती घाबरेल असे म्हटले.

याचा राग येऊन बबन आसाराम कराळे, भाऊ आसाराम कराळे, राधाकिसन भाऊ कराळे, प्रशांत महादेव गायकवाड, नवनाथ परसराम कराळे, पप्पू आसाराम गायकवाड, संदीप मळु गायकवाड, वैभव दत्तू पागिरे (सर्व रा. आगडगाव) यांनी बोरुडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत हातातील काठ्या, तलवार, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले.

या प्रकरणी रंगनाथ बोरुडे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24