घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे – स्मृती इराणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे.

श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. त्यांनी नागवडे आणि पाचपुते हे समाजाच्या कल्याणासाठी एकत्र आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते पाण्याबाबत काय म्हणाले होते याची आठवण आहे का? असे विचारत अजित पवार यांना टोला मारत पाण्याची मागणी केल्यावर केलेल्या मावळच्या गोळी बाराची आठवण करून दिली.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ मुक्त होत असल्याने सांगितले यावेळी आमदार सुरेश धस, खासदार सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदींची भाषण झाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24