जामखेड: आगामी कर्जत जामखेड मतदार संघात युवा नेते रोहित पवार यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी काळात तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय संकल्प मेळाव्यात घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाचा युवा नेतृत्व विकी सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली महावीर भवन येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समाजातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर बोलताना सदाफुले म्हणाले कि, पालकमंत्री राम शिंदे यांनी शहरात दोन कोटी रुपयांचे डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मंजूर केले होते.
परंतु ते न बांधता निधी जाणीवपूर्वक परत पाठवला आहे. तसेच जामखेड मधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे पक्ष न बघता विकासत्मक काम करणारा उमेदवार पाहिजे.
आणि राष्ट्रवादीचे रोहित पवारच विकास करु शकतात असा सुर समाजातून निघाला आहे. त्यामुळे एकमुखाने आबेडकरी समाजाचा रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा असणार आहे.