नीलेश लंके यांचा शेतकऱ्यांशी संवाद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचाराचा तालुक्यात विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिल्याचे दिसत आहे.

लंके यांच्या प्रचारार्थ आज पारनेर शहरातील आठवडे बाजारासाठी तालुक्यातील खेड्या -पाड्यांतील आलेले अनेक शेतकरी बांधव, ग्राहक व विक्रेते यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या वेळी विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनीही नीलेश लंके यांच्याप्रचारात सक्रिय सहभाग घेतला.

या वेळी नगरसेवक नंदकुमार औटी, सुभाष औटी, सुरेश औटी, अपंग विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सनी थोरात, दत्ता कावरे, पोटघन मेजर, जितेश सरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टाकळी ढोकेश्वर येथे नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी जयसिंग पाटील खिलारी, महेश झावरे, संजय झावरे, दत्तात्रय निवडुंगे, अंकुशसेठ पाइमोडे, विलास ठुबे, विलास धुमाळ, बबन बांडे, दामोदर झावरे, गुलाब भाई, बबन पायमोडे, राहुल झावरे, सोमनाथ बांडे, योगेश शिंदे, प्रमोद खिलारी, कुंडलिक गायकवाड आणि कार्यकर्ते उपस्थित होत.

वाळवणे येथे प्रचाराचा नारळ फोडून सुपा गणात प्रचारास सुरुवात करण्यात आली. या वेळी वैभव काळे, अमोल पवार, अनिकेत पवार, पप्पू जाधव, विशाल ठोंबरे, सागर रोकडे, शाम जाधव, दादा दानवे, अमोल पठारे,

बापू थोरात, प्रशांत रोकडे, अक्षय थोरात, राहुल थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते. लंके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये घरोघरी प्रचार सुरू केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24