कुकाणे : ३७० कलम रद्द हा प्रचाराचा मुद्या नाही, असे विरोधक म्हणत असतील, तर तो मुद्दा आमच्या संस्काराचा व तिरंग्यावर प्रेम असलेल्या स्वाभीमानाचा आहे.
राष्ट्रवादीने राज्याचेच बारा वाजवल्याने येत्या २४ तारखेला घड्याळ कायमचे बंद पडणार आहे आणि हेच घड्याळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंकजा यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र हिच आमची घोषणा असून जनतेने आमचे विकासाचे राजकारण स्वीकारलेले आहे, असा विश्वास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.
शनिवारी दुपारी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ नेवासे तालुक्यातील पांढरीपूल येथे मंत्री पंकजांची जाहीर सभा झाली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी या सभेत सहकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केल्याने लंघे यांच्यासह सहकाऱ्यांचा मंत्री पंकजांच्या हस्ते सत्कार करून स्वागत करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी या सभेत सहकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केल्याने लंघे यांच्या सह सहकायांचा मंत्री पंकजांच्या हस्ते सत्कार करून स्वागत करण्यात आले. खासदार सुजय विखे, आमदार कर्डिले, राजळे व मुरकुटे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आमदार कर्डिले यांनी प्रास्तविक व स्वागत केले. यावेळी खासदार विखे यांनी मी नगर जिल्ह्यातील घड्याळ बंद पाडल्याने वेळेचे भान नसल्याचे व मंत्री पंकजांमुळे राज्यातील खडतर रस्ते आता सुखकर झाल्याचे सांगितले. आमदार मुरकुटेंचेही यावेळी भाषण झाले.